मुख्याधिकारी शारदा दळवींनी हाती दंडुका घेत हिसका दाखवताच मोकाट भटकणारे, भाजी मार्केट झाले सुतासारखे सरळ

संचारबंदी शिथील काळात बेशिस्तपणे वाहने उभी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता गर्दी केली जात होती. नायब तहसिलदार तथा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शारदा दळवी यांनी स्वत:च हाती दंडुका घेतला आणि गर्दीत शिरताच सोशल डिस्टन्सींग तयार झाले.
ashti chief officer takes stringent action against law and order breakers 
ashti chief officer takes stringent action against law and order breakers 

आष्टी (जि. बीड) : करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिशादर्शक ठराव असा बीड पॅटर्न केला असला आणि त्याची चोख अंमलबजावणी व कौतुकास्पद पालन होत असले तरी शिथिलतेच्या काळात गर्दीचे प्रकार घडत आहेत. अशीच आष्टी येथे बाजारात गर्दी झाली आणि खुद्द नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी शारदा दळवींनी हातात दंडुका घेताच काही वेळात सोशल डिस्टसींग तयार झाले.

करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग हेच प्रभावी शस्त्रे आहेत. जिल्ह्यात संचारबंदीचे काटेकोर अंमलबजावणी होत आहे. त्यातच संचारबंदीतून अत्यावश्यक कामांसाठीची शिथिलताही सकाळच्या वेळेचीच हा देखील वेगळा प्रयोग जिल्ह्यात होत आहे. परंतु, या काळात बेशिस्तीचेही प्रदर्शन अनेक ठिकाणी घडत आहे. अशा मंडळींना पोलिसांच्या दंडुक्यांचाही प्रसाद मिळत आहे. 

दरम्यान, आष्टीत संचारबंदी शिथिलतेच्या काळात गर्दी झाली आणि सोशल डिस्टन्सींग पाळले जात नसल्याचे दिसून आले. यावेळी नायब तहसीलदार तथा नगर पंचायतच्या मुख्याधिकारी शारदा दळवी स्वतः दंडुका हाती घेऊन रस्त्यावर उतरल्या. बेशिस्तपणे रस्त्यावर गर्दी करून भटकणाऱ्या मोकाटांना दळवी यांनी चांगलेच वठणीवर आणले. महिला अधिकाऱ्यांच्या या पवित्र्याने गर्दीतील बेशिस्तांना चांगलाच धडा मिळाला.

दरम्यान, महिला अधिकाऱ्याने शिस्त लावण्यासह सोशल डिस्टन्सींग करण्यासाठी दंडुक्याच प्रसादही दिला. त्यामुळे संपूर्ण भाजीमार्केट पंधरा मिनिटात सुतासारखे सरळ झाले. महिला अधिकाऱ्याच्या धडाडीची चर्चाही झाली आणि सोशल मिडीयावर कौतुकही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com